Skip to main content

Importance Of Chemistry In Everyday Life

  SERIES-2.1: IMPORTANCE OF CHEMISTRY  IN EVERYDAY LIFE LET ME GLANCE AT THE VIGYAN STORY THROUGH THE IMPORTANCE OF CHEMISTRY IN EVERYDAY LIFE IN DETAIL: Have you ever wondered about the importance of chemistry in day to day life?   Importance and scope of chemistry are huge!  In this Vigyan Story , we will look at some of the practical applications of chemistry.   Chemistry in everyday life is one of the chapters of chemistry. Finding an answer is one of the most common chemistry homework assignments , main moto behind assignments is to found out, how we use chemistry in daily life, and we got an answer that, Chemistry is present everywhere , That's how we practically learn chemistry. Here's a look at why chemistry matters: If you already studied Chemistry or having knowledge about it, you must have wondered about the importance of chemistry in everyday life. It is the branch of science which deals with the investigation of the properties and c...

विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा?

विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा?



या मालिकेत आपण विषय म्हणून विज्ञानाच्या विविध बाबींचा अभ्यास करू. 

मालिका 1 - प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये  विज्ञान विषयाची  सुरुवात . 
विज्ञान हा शब्द लॅटिन शब्द scientia या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ "ज्ञान" आहे.

विज्ञानाचे मूल्य हे समाजासाठी आहे. कारण याच्या ज्ञानाचा उपयोग केल्यास मानवी मूलभूत गरजा पूर्ण होण्यास मदत होते.उदाहरणार्थ : आरोग्य विज्ञान आणि औषधे किंवा आपण बाजारातून जे काही विकत घेतो.अशा विविध गोष्टी या विज्ञानाचेच अविष्कार आहेत .थोडक्यात दैनंदिन जीवनात विज्ञानाची एक महत्वाची भूमिका आहे. 
School, Back To School, Schulbeginn, School Enrollment
सुरु करूया शाळेत असतानाची हि विज्ञान विषयाची कथा...! 
 
अभ्यासक्रमानुसार ,आपण विविध विज्ञानाच्या शाखांमध्ये तसेच विज्ञानाशी संबंधित नवीन नवीन शब्द अभ्यासतो. विद्यार्थी हे सुरुवाती पासूनच विज्ञानाची फक्त पुस्तके वाचतात. त्यामुळे विज्ञान हे केवळ पाठ करण्या पुरतेच मर्यादित राहून जाते आणि कंटाळवाणे वाटते .त्यामागे अनेक कारण आहेत.अर्थातच काही विद्यार्थी अपवादही आहेत . परंतु येथे ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाबद्दल "भीती" किंवा त्यांना "हे अवघड आहे" असे वाटते अशा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे ..!

मी त्यांच्याशी संबंधित काही मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
Key, Question, Answer, Success, Strategy, Assistance
  • अभ्यास करताना आपण संकल्पना (concepts) समजून घेत नाहीत . 
  • परीक्षेच्या वेळी परीक्षा देण्यापुरतीच अभ्यास करणे. 
  • परीक्षेच्या वेळी विद्यार्थी थेट प्रश्न संचाकडे वळतात व उत्तरे पाठ करतात. म्हणजे केवळ "वाचन".  ( हल्ली याला रट्टा फिकेशन म्हणतात ). 
  • आपण दैनंदिन जीवनात विज्ञानाचे उत्पादन वापरतो. त्याच्या मागे असणारं विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. विज्ञान विषयात प्रत्येक पाठाचे गूढ हे त्याच्या संकल्पनेत आहे. संकल्पना कळली नसेल तर विद्यार्थांना असे वाटते की विज्ञान हा विषय गणित किंवा इतर विषयांपेक्षा अवघड आहे.
  • वैज्ञानिक भाषा न समजणे हे सुद्धा कारण असू शकते. 
  • अभ्यासक्रमात दिलेल्या आकृत्याकडे विद्यार्थी मुख्यतः दुर्लक्ष करतात.
  • सर्व विषयांचा दैनिक गृहपाठ पूर्ण करणे ही विद्यार्थ्यांची रोजची दिनचर्या आहे. त्यामुळे प्रत्येक विषयासाठी वेळापत्रक निश्चित केलेलं नसल्याने विषय समजून घ्यायला वेळ लागतो ..!

Myanmar, Burma, Girl, Woman, Write, Exam, Test, Sit

परीक्षेच्या शर्यतीत धावताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात दोन नवीन शब्द नेहमीच लक्षवेधीत असतात. ते म्हणजे  "लक्ष आणि एकाग्रता".
याच एकाग्रतेने अध्यायात दिलेला परिच्छेद समजून घेण्याचा विद्यार्थी खूप प्रयत्न करतात ... 10 वेळा किंवा बर्‍याच वेळा फक्त 1 च वाक्याचे पठण करतात. परंतु दुसर्‍या दिवशी पेपर सोडविताना काहीही आठवत नाही ..! 

हि वरील यादी कधीही थांबणार नाही. कारण मला असे वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांची "विज्ञान कथा"  ही वेगळी आहे...! 
आपण अनुभवलेल्या विज्ञान कथांपैकी काही प्रश्न मी खालील यादीत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे . 
Teacher, Paper, Woman, Brainerd, Kids, Girls
  • सर्व प्रथम संकल्पना समजून घ्या. 
  • विज्ञान हा सिद्धांतिक तसेच प्रॅक्टिकल विषय आहे. त्यास प्रॅक्टिकल दृष्ट्या समजून घेणे महत्वाचे आहे.
  • संकल्पना नेहमी लक्षात राहतात. म्हणून परीक्षेच्या वेळी विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला रस वाटेल.
  • दररोजच्या जीवनातील संकल्पनांशी संबंधित विविध क्षेत्रातील विज्ञानाच्या नवकल्पना आणि शोध या बद्दल माहिती घ्यायला सुरुवात करा.
  • उदाहरणार्थ:जसे आपण रोबोट्स, कार,अ‍ॅनिमेटेड व्यंगचित्र हे "कसे कार्य करतात" याचा शोध घ्या.विविध उपकरणा बद्दल पश्नावली निर्माण करा. त्यामुळे अधिक रुची निर्माण होईल ...!  
  • वैज्ञानिक भाषा आणि संज्ञा मुख्यतः ग्रीक आणि लॅटिन भाषेतील असतात. त्यामुळे समजणे कठीण आहे असे वाटते. म्हणूनच त्या शब्दांचा अर्थ लिहा आणि युक्त्या वापरुन सुलभ स्वरूपात लक्षात ठेवा.
  • "रेखाचित्र व आकृत्या" हे विषय समजून घेण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात त्यास पूर्णपणे जाणून घ्या.
  • कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्यासाठी टाइम स्लॉट देखील महत्त्वाचे असतात. कारण प्रत्येक विषय हा महत्वाचा असतो.

आत्मविश्वास आणि उत्साह ही प्रत्येक विषय शिकण्याची गुरुकिल्ली आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे असा कि, कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना आपल्या आवडत्या भागापासून  सुरूवात करावी. असे केल्याने आत्मविश्वास निर्माण होईल या नंतर कठीण भागाला सुरुवात करा ...! 

Education, Learning, School, Educate, Children

अशी विज्ञान कथा मी परत घेऊन येत पर्यंत...कंमेंट💬 बॉक्समध्ये मला तुमची रुचीपूर्ण विज्ञान कथा शेअर करा ...! 

Comments

Popular posts from this blog

दैनंदिन जीवनातील विज्ञान

भाग -2👉परिचय : दैनंदिन   जीवनातील विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जवळ पास सगळ्याच क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही असे म्हणता येईल.  हल्ली तंत्रज्ञान समजून घेणे हे महत्वाचे झाले आहे आणि तंत्रज्ञाना बद्दल संपुर्ण माहिती असेल तर त्याचा उपयोग करताना अगदी सोपी वाटते पण माहिती नसल्यास ते अवघड वाटते , त्यामुळे विज्ञानाला नवनवीन प्रकारे सोप्या भाषेत समजून घेणे गरजेचे आहे .   आपण पाहत असलेली प्रत्येक गोष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देणगी आहे.प्रत्येक तंत्रज्ञानामागे वेगवेगळ्या  विज्ञान कथा आहे. जसे दिवसभर आपण विज्ञानाने निर्माण केलेली साधने वापरतो. आपण करू इच्छित असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी फक्त "एका -क्लिक" ची गरज असते .   उदा. ऑनलाईन शॉपिंग, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांसारख्या तंत्रज्ञानापासून आपली दिवसाला सुरुवात होते...!  मित्रांनो तुम्हाला मुद्दा लक्षात आला असेल, हे सर्व काही विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे साध्य झाले आहे. प्रत्येक  तंत्रज्ञाना  माग...

How to study Science Subject?

How to study Science Subject? SERIES 1 - BEGINNING OF SCIENCE SUBJECT OF EVERY STUDENT'S LIFE. The term  science  comes from the Latin word  Scientia , meaning “knowledge”. In this series, we will study various aspects of science as a subject. Science is valued by society because the application of its knowledge helps to satisfy many basic human needs, for example, various terms regarding health science and medicines or anything which we purchase from the market. In short, In day to day life science plays a very important role.             Let's start the journey of science as a subject from our school days, it will help you to understand the science. According to the curriculum, we come across various branches and new terminologies related to science, sometimes students only read science books and it looks too lengthy and boring becaus...

Examples Of Physics In Everyday Life

SERIES-2.2👉: EXAMPLES OF   PHYSICS  IN EVERYDAY LIFE       The word  'Physics'  comes from the Greek   word  'knowledge of Nature,'  and in general, the field aims to analyze and  understand the natural phenomena  of the Universe. Physicists have divided the subject into various branches and each branch has acquired a title of a full subject in modern days. Physics is also one of the most important subjects of all Science. LET ME GLANCE AT THE VIGYAN STORY THROUGH THE EXAMPLES   OF PHYSICS IN EVERYDAY LIFE IN DETAIL: The life of today’s human being is completely dependent upon the machinery. This speed of development achieved the greatest impetus by the end  of the 19th century and in 20th-century man became able to see into the world of small microscopic subatomic particle atom to the large macroscopic  mysteries galaxies.  The man reached the moon and explored the deserts of space and  expan...